सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९ टक्के

आरपीडीचा राहूल गावडे ९२.८३ टक्क्यांसह प्रथम, वैष्णवी भांगले द्वितीय | बांदा खेमराजची रिद्धी तळगांवकर ९१.८३ टक्के गुणांसह तृतीय | १०० पैकी १०० गुण मिळवत विक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2024 15:04 PM
views 195  views

सावंतवाडी : उच्च माध्यमिक शालांत परिक्षा २०२४ अर्थात बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या १७०५ विद्यार्थ्यांपैकी १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आरपीडीचा विज्ञान शाखेचा राहूल गावडे ९२.८३

टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आला. आरपीडीची वाणिज्य शाखेची वैष्णवी भांगले ९२.५० टक्के गुण मिळवित द्वितीय तर बांदा खेमराजची व्यवसायिक अभ्यासक्रमची विद्यार्थिनी रिद्धी तळगांवकर ९१.८३ टक्के गुणांसह तृतीय ठरली. मिलाग्रीसची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी सना चोडणेकर ९१.६७ टक्के गुण मिळवित चतुर्थ ठरली. तालुक्यातील आंबोली, मिलाग्रीस, बांदा, नेमळे, सांगेली या प्रशालांनी आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

        

श्री पंचम खेमराज महाविद्यालय  सावंतवाडीचा १२ वीचा निकाल ९९.६५ टक्के एवढा लागला आहे. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स विभागात २८६  पैकी २८५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत प्रथम साईश कांबळी ८६.३३ टक्के, द्वितीय सानिया आंगचेकर ८४.६७ टक्के तर मॅकलीन लोबो ८२.३३  टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. आर्ट्स विभागात सानिया आंगचेकर ८४.६७ टक्के प्रथम, दिशा नाईक ७५.८३ टक्के  द्वितीय, सोनालीका पेडणेकर ६५.३३  टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर कॉमर्स शाखेत  सोहा सावंत ७८.५० टक्के प्रथम, द्वितीय निशिगंधा सावंत ७४.८३ टक्के    तर तृतीय प्रिती पुरोहित ७७.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सायन्स शाखेतून साईश कांबळी ८६.३३ टक्के प्रथम, ८२.३३ टक्के मॅकलीन लोबो द्वितीय, लावण्या रेडकर ८२ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

     

राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचा १२ वीचा निकाल आर्ट्स ९९.६२ टक्के, कॉमर्स ९९.६९ टक्के, सायन्स ९९.६२ टक्के तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. यात १०० पैकी १०० गुण भक्ती गुडगीळ हीन अकाउंटन्सी विषयात प्राप्त केले. तर श्रावणी रासम, सिद्धार्थ आडेलकर, आदिती चव्हाण, तन्मय गवस, सिमरन पास्ते यांनी आयटी विषयात १०० गुण मिळवत विक्रम रचला आहे‌. यात प्रशालेत कला विभागात खुशी रेडकर ८७.५० टक्के प्रथम, द्वितीय स्नेहल गावडे ८५.५० टक्के तर सेजल नाईक ८४  टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कॉमर्स विभागात वैष्णवी भा़ंगले ९२.५० टक्के प्रथम,  धनेश नाईक ९१ टक्के  द्वितीय,  आर्या कुरतडकर  ९०.६७  टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर विज्ञान शाखेत  राहुल गावडे ९२.८३  टक्के प्रथम, द्वितीय  पार्थ राऊळ ९०.५० तर तृतीय श्रावणी रासम व सलोनी कोटकर ८७.१७  टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी शाखेतून निलेश सावंत ६२.३३  टक्के प्रथम, टक्के द्वितीय वासुदेव गावडे ५९, तर ५८.३३  टक्के गुण मिळवत धनश्री राऊळ हीन तृतीय क्रमांक पटकावला आहे.


राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचा  विज्ञान शाखेचा राहुल गावडे ९२.८३ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याच्या या घवघवीत यशानंतर अभिनंदन करताना राहुलच्या मातोश्री.


राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीची कॉमर्स विभागाची वैष्णवी भा़ंगले ९२.५० टक्के गुणांसह तालुक्यात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तिच्या या घवघवीत यशानंतर तिचं तोंड गोड करताना श्री व सौ. भांगले.

मिलाग्रीस महाविद्यालय सावंतवाडीचा १२ वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. कॉमर्स अँड सायन्स विभागातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत विज्ञान शाखेत स्वरा दळवी ८३.१७ टक्के प्रथम, द्वितीय आयडोनिया परेरा ८०.१७ टक्के तर सेबास्टियन सालदान्हा ७७.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कॉमर्स  विभागात सना चोडणेकर ९१.६७  टक्के प्रथम,  रोशनी सावंत ८८.१७ टक्के  द्वितीय,  डेन्झिल डिसोझा ८३.६७   टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या बारावी कला शाखेतील प्रविष्ठ  २८ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल ९६.४२ टक्के लागला. यात प्रथम क्रमांक कोचरेकर स्नेहा विनायक ७९.३३ टक्के द्वितीय आडवे बाया न्हानू ७४. १७ टक्के, तृतीय वडार विक्रम परशुराम ७१.८३ टक्के तर चतुर्थ  वैद्य सिया मनोज ७० टक्के यांनी उज्वल यश संपादन केले.

 धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट शाखेतून प्रथम क्रमांक, रिद्धी तळगावकर हिने ९१.८३ टक्के गुण मिळवित प्रशालेत प्रथम तर तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. यात विज्ञान शाखेतून प्रणव नाईक ९० टक्के द्वितीय संकेत देसाई ८५ टक्के इशा महाजन ८३.३३ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेतून जानवी ठाकूर ८८ टक्के प्रथम, कमल वडार ८७ टक्के द्वितीय, संकल्प गवस याने ८५.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेतून प्रथम सानिया मयेकर ८१ टक्के,  द्वितीय तनय केसरकर ७८.५० टक्के तर तृतीय क्रमांक दिपराज सावंत सावंत  ७६.५० टक्के गुण मिळवित  मिळविला. व्हर्टिकल्चर शाखेतून नयन डिंगणेकर ५४.१७ टक्के तर  अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट शाखेतून प्रथम क्रमांक,  रिद्धी तळगावकर ९१.८३ टक्के  गुण मिळवित प्रथम, द्वितीय क्रमांक आकांक्षा सावंत ९०.३३ टक्के तर नेहा ठाकूर ९०.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी शाखेतून मनोहर गावडे ७६.१७ टक्के प्रथम,  द्वितीय क्रमांक गौरेश वालावलकर ७४.६७ टक्के  तर तृतीय क्रमांक पार्थ चव्हाण ७४.१७ टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक प्राप्त केला.


नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळेचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. तर कला शाखेचा निकाल ९२.३९ टक्के लागला. यात वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक गौरवी खोत ७०.६७ टक्के द्वितीय ऋतिका राऊळ ६६ टक्के तर तृतीय क्रमांक यतिन गावडे ६३.३३ टक्के गुण मिळवत प्राप्त केला. तर कला शाखेत वेदांत मुळीक ७५.८३ टक्के प्रथम, द्वितीय क्रमांक निमिषा धुरी ६१.१७ टक्के तर तृतीय क्रमांक राजेश बिर्जे यान ६० टक्के गुणांसह प्राप्त केला. 

आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ३८ विद्यार्थी या प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यात प्रथम अलेक्स सावंत ८६ टक्के, द्वितीय अजय गावकर ८१.१७ टक्के तर सुयश कदम ८०.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडे १२ वीचा निकाल ९१.१३       टक्के एवढा लागला आहे. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स विभागात  ३४  पैकी  ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत कला शाखेतून सानिका गोसावी ७१.१७ टक्के प्रथम, द्वितीय सिद्धेश जाधव ६१.१७ टक्के तर आत्माराम परब ५९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली  महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून परिक्षेला एकूण १०२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. कला शाखेतून अक्षता ७०.८० टक्के, द्वितीय शुभम पवार ५७.३३ टक्के, कनिषा चव्हाण हिने ५४.१७ टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेतून खुशी राऊळ ७६.६७ टक्के,  द्वितीय मंजुषा राऊळ ६८.१७ टक्के तर तृतीय विद्या राऊळ ६७.५० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तर विज्ञान शाखेतून प्रतीक्षा गावडे ७७.५० टक्के प्रथम,  देवांक सावंत ७३.६७ टक्के द्वितीय तर इशा सांगेलकर ७३.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. 

आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल ८५ टक्के लागला आहे. प्रशालेतून तेजल धोंडू शेळके ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सोनाली संजय नाईक ७२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संजना चंद्रकांत आरोसकर ६७.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. आरोंदा ज्युनिअर कॉलेजचा निकाल ८८.८८ टक्के एवढा लागला. यात राधिका देवाजी ७९.५५ टक्के गुणांसह प्रथम, प्रभाकर विर्नोडकर ६७.८३ टक्के द्वितीय तर दिव्या रेडकर ६७.५० टक्क्यांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.गुणवंत विद्यार्थ्यांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.