सावंतवाडी तालु‌का भंडारी मंडळ अध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर

Edited by:
Published on: December 20, 2024 13:33 PM
views 306  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालु‌का भंडारी मंडळाची वार्षिक सभा  भंडारी भवनाच्या सभागृहात प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत २०२५ ते २०२८ साठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच उपाध्यक्ष गुरूनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, बाळा आकेरकर, हनुमंत पेडणेकर, सचिव दिलीप पेडणेकर, सहसचिव नामदेव साटेलकर, खजिनदार चंद्रकांत वाडकर, सदस्य राजेंद्र बिर्जे, नंदकिशोर कोंडये, शंकर साळगावकर, दीपक नाईक, लवू कुडव, दीपक जोशी, निलेश कुडव, संजय पिळणकर, ज्ञानदीप राऊळ, सिद्धार्थ पराडकर, देवता पेडणेकर, समता सुर्याजी, सुरेश राऊळ यांनी निवड करण्यात आली. सावंतवाडी तालु‌का भंडारी मंडळाची वार्षिक सभा भंडारी भवनाच्या सभागृहात पार पडली.

या सभेस उपाध्यक्ष देवीदास आडारकर, गुरूनाथ पेडणेकर, खजिनदार श्री. वाडकर,  सचिव दिलीप पेडणेकर, सहसचिव नामदेव साटेलकर, हनुमंत पेडणेकर, ज्ञानदिप राऊळ, दीपक जोशी, निलेश कुडव, संजय पिळणकर, सिद्धार्थ पराडकर, रत्नाकर नाईक, लवू कुडव, ज्ञानदीप राऊळ, गुरुदास पेडणेकर, कमलाकांत मुंडये आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री. साटेलकर यांनी वार्षिक अहवाल वाचून मंडळाची प्रगती व पुढील उपक्रम, कार्यक्रम सर्वांसमोर ठेवले. दिलीप पेडणेकर यांनी मंडळाच्या , वस्तीगृहाच्या जमाखर्चाचे वाचन केले. महिला वसतिगृहाच्या व मंडळाच्या समस्यांबाबत समग्र चर्चा करण्यात आली. मंडळाची प्रगती, कार्यक्रम याबाबत सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले. महिला दिन, रक्तगट तपासणी, रक्तदान, विद्यार्थी गुणगौरव, क्रीडा स्पर्धा, वधूवर मेळावा, सहल, स्नेह मेळावा, दिनदर्शिका आदी मंडळाचे उपक्रम कायम  करण्याचे सर्वांनी मान्य केले. तसेच पुढील तीन वर्षांसाठी कार्यकारिणीत राजेंद्र बिर्जे, सुरेश राऊळ, दीपक नाईक, नंदकिशोर कोंडये, शंकर साळगावकर व सल्लागार सतीश नाईक, नारायण मसूरकर यांनी निवड करण्यात आली. दाते व सर्व सदस्यांचे आभार श्री. पिळणकर यांनी मानून सभेची सांगता केली.