
सावंतवाडी : युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार विकास निधीतून विंधन विहिरीचा आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शुभारंभ करण्यात आला. मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये हॉस्पिटलला पाण्याची टंचाई भासत होती त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते.
त्यामुळे आता पाण्याची टंचाई दूर होणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य देव्या सूर्याजी व रवी जाधव यांना यासाठी प्रयत्न करायला सांगितले होते. यावेळी देव्या सूर्याजी यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून विंधन विहिरीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. नुकताच त्या कामाचा शुभारंभ झाला आहे.
हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. ऐवळे, कर्मचारी, रुग्ण व सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी देव्या सूर्याजींचे आभार मानले. याप्रसंगी देव्या सूर्याजी, रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे व बोरवेलचे मालक रुपेश माणगावकर, हॉस्पीटल कर्मचारी सर्वेश घाडी आदी उपस्थित होते.










