
सावंतवाडी : श्रीराम जन्मभूमी अयोध्यानगरीत प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त सावंतवाडी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहाच वातावरण पहायला मिळालं. सावंतवाडीतील लाखो भक्तगण रामभक्तीत तल्लीन झाले. ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन यानिमित्ताने करण्यात आलं होतं. भगवमय वातावरण सर्वत्र पसरलं असून राम जपानं रामराज्य असणारी सावंतवाडी दुमदुमून गेली होती.
सालईवाडा येथील श्री रुद्र हनुमान मंदिरामध्ये सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी लघुरुद्र महाअभिषेक, श्रीराम जयराम जय जय राम या विजय महामंत्राचा १०८ वेळा सामूहिक जप, महाआरती, महाप्रसाद पार पडला. माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी उपस्थित राहून दर्शन घेतलं. मोठ्या संख्येने रामभक्त यावेळी उपस्थित होते. तर शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाच वातावरण पहायला मिळत आहे. सत्यनारायण पूजा, हनुमंतास लघुरूद्र अभिषेक, करण्यात आले. विठ्ठल मंदिरात कीर्तन प्रवचन कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं.
मंदिरासाठी बलिदान देणाऱ्या कारसेवक, रामसेवकांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. भगवे झेंडे, भगवे पताका रस्त्याच्या दुतर्फा लागल्यानं परिसर भगवामय झाला. श्री रामाच्या प्रतिमा, सांस्कृतिक कार्यक्रम हे खास आकर्षण ठरले. ऐतिहासिक मोती तलावासह सर्वत्र विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मिठाईच वाटप करून तोंड गोड करण्यात आल. संध्याकाळी शहरात दिपोत्सव, भजन आणि आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजन करण्यात आले आहे. यामुळे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भाग देखील रामभक्तीत तल्लीन होऊन गेला आहे.