सावंतवाडी रेल्वेस्टेशन इथं विविध कार्यक्रम !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 10:03 AM
views 304  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वेस्टेशन येथे उद्या २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार २६ रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा नंतर आरती तिर्थप्रसाद, दुपारी १२.३० ते २.वाजेपर्यत महाप्रसाद,संध्याकाळी स्थानिकांची भजने, रात्री ७ वाजता श्री अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा ट्रिकसिनयुक्त “ शुक्ररुद्र संग्राम” हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे कर्मचारीवृंद सावंतवाडी यांनी केले आहे.