
सावंतवाडी : सावंतवाडी उपविभागातील तहसिल सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता मंजूर बिंदूनामावली प्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधित गावचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीद्वारे करायाची आहे. त्याकरीता आरक्षण सोडत काढण्याकरीता गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, उपविभाग सावंतवाडी मधील रिक्त पोलीस पाटील पदांच्या गावांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून यात सावंतवाडी तालुक्यातील ३६ , वेंगुर्ला तालुक्यातील ७२ व दोडामार्गमधील १७ अशा एकूण १२५ पदांकरीता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
यात सावंतवाडी तालुक्यतील कलंबिस्त, डिंगणे, मासुरे, नाणोस, साटेली त. सातार्डा, केगद, सोनुर्ली, मळगांव, ब्राहमणपाट, गुळदुवे, उडेली, कुंभारवाडा, पारपोली, धाकोरा, बादा, सरमळे, कोंडूरा, निरुखे, तांबोळी, सावरजूवा, भोम, घारपी, भटपावणी, भैरववाडी, न्हावेली ,सावरवाड, क्षेत्रफळ, देवसू, नेने, कुंभार्ली, निरवडे, डेगवे, डोंगरपाल, फणवसडे, आरोस (गावठाण) व पडवे आदी गावांचा व महसूली गावांचा समावेश आहे.
तर वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला, मठ, मातोंड, तुळस, होडावडा, वजराठ, वेतोरे, केळूस, कोचरा, म्हापण, कामळेवीर, परुळे भाग - २, सतये, नवाबाग, वाघेश्वर, परबवाडा, सिद्धार्थवाडी, वरचेमाड, कुर्लेवाडी, मुठ, गिरपवाडी, पलतड, खटारवाडी,परबवाडी, सुभाषवाडी, जोसोली, न्हैचीआड, नमस, आडारी, भेंडमळा, सुखटणबाग, कांबळेवाडी, वडखोल, पंडूर, सातवायंगणी, बागायत, परबगाव, वेळागर, गांधीनगर, वरचीकेर, खालची केर, सुकळभाट, बोंबडोजीचीवाडी, म्हारतळे, कनयाळ, गावतळे, हुडा, सोन्सुरे, बांध, टेंब, सागरतीर्थ, सखैलखोल, टांक, खालचीवाडी, भोगवे, शेळपी, कर्ली, चिपी, रावदस, गवाण, खवणे, मायने, श्रीरामवाडी, मेढा, वरचीआड, पालकरवाडी, काळवी, तळेकरवाडी, वायंगणी, भंडारवाडा, देवसू व पिंपळगाव आदी महसूली गावांचा समावेश आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील खडपडे, पाटये, मांगेली, पणतुर्ली, घोटगेवाडी, खानयाळे, कुडासे ,केर, शिरंगे, साटेली-भेडशी, कुंब्रल, पाल , उसप, पाळये, तळकट, कुंभवडे व भिकेकोनाळ आदी महसूली गावात ही रिक्त पदे आहेत. याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार सावंतवाडी यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.