सावंतवाडी पोलिस निरीक्षकपदी तानाजी नारनवर !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 09, 2024 13:33 PM
views 41  views

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी तानाजी नारनवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या कार्यपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची बदली पुणे ग्रामीण येथे झाली. त्यानंतर गेले काही दिवस हे पद रिक्त होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्याकडे हा कार्यभार होता. मात्र, आता तानाजी नारनवर यांनी कार्यभार स्वीकारला. ते यापूर्वी रायगड येथे कार्यरत होते.