'स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' !

मदर क्वीन्समध्ये सावंतवाडीचा न. प. चा उपक्रम
Edited by: विनायक गावस
Published on: November 09, 2023 13:42 PM
views 84  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदमार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी" ह्या उपक्रमाअंतर्गत मदर क्वीन्स शाळेत पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी ह्याबाबत मार्गदर्शन शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी मदर क्वीन्स शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्यावेळी विद्यार्थ्यांनी हरित दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.

ह्यावेळी आरोग्य विभाग प्रमुख रसिका नाडकर्णी ह्यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्लास्टिक बॉटल पासून कंदील कसा बनवायचा ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले. प्लास्टिक पुनर्वापर व 3R प्रिन्सिपल बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.