
सावंतवाडी : क्षितिज इव्हेंट आयोजित नाट्यमेळा सावंतवाडी प्रस्तुत श्री परमेश्वर निर्मित प्रा. वसंत कानेटकर लिखित संगीत 'मत्स्यगंधा नाटक' शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वा. बॅ. नाथ पै. सभागृह सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. याच दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता, नेपथ्य बाळ पुराणिक असून स्थानिक कलावंतांची निर्मिती असलेलं हे संगीत नाटक आहे.
प्रा. वसंत कानेटकर लिखित संगीत 'मत्स्यगंधा नाटक' शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी येथे होत आहे. बॅ. नाथ पै सभागृहात या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगात स्वप्निल गोरे, केतकी सावंत, गणेश दीक्षित, आशुतोष चिटणीस, उमा जडये, योगेश प्रभू, तेजस प्रभू देसाई आणि बाळ पुराणिक या कलाकारांच्या समावेश आहे. याशिवाय उमेश कोंडये, संजय जोशी, वैभवी पुराणिक, गणेशप्रसाद गोगटे, रावजी पार्सेकर व सहकारी यांच सहकार्य नाट्यप्रयोगात असणार आहे. तसेच ऑर्गन साथ प्रसाद शेवडे व तबला साथ निरज भोसले करणार आहेत. तिकिट विक्री १० फेब्रुवारीपासून पुराणिक फुडस, गांधी चौक व राजश्री फोटो स्टुडिओ येथे सुरु करण्यात आली आहे. या संगीत नाट्यप्रयोगाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.