ठेकेदारांची सुरूय दुकान

तौकिर शेख यांचे पुराव्यानिशी आरोप
Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 12:11 PM
views 147  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या टेंडरबाबत ठेकेदारांचा गृप असून गौरव जाधव यांनी विलास जाधव यांना विचारूंच टेंडर भरा असा मेसेज केला आहे. हे विलास जाधव कोण आहेत ? असा सवाल कॉग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी केला. 

सर्वसाधारण सभेत त्यांनी चॅटचे पुरावे देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळीॲड. अनिल निरवडेकर यांनी विस्तृत माहिती घेऊन दोषी असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, माहिती घेऊन याबाबत खुलासा केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी यात नगरपरिषदेची बदनामी होत असून यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली. तसेच प्रशासकीय कार्यकाळात मुलगी शिकत असताना तिच्या नावावर ठेका घेतल्याचा आरोप त्यांनी दादा गवंडीवर केला. तर सुशांत बांदेकर व दिनेश मुदगुल हे दोन ठेकेदार कोटींची टेंडर घेऊन काम वाटण्याच दुकान चालवत असल्याचा आरोप केला.