
सावंतवाडी: अवकाळी पावसाने तालुक्यात दाणादाण उडवली. यात शहरातील भटवाडी येथे सात ते आठ, माठेवाडा ५ तसेच आरोस गावात वादळी वारा झाल्यानं झाड पडून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
काही ठिकाणी तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. युद्धपातळीवर महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहेत. शहरी भागात अजून दिड ते दोन तास विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास लागेल कशी माहिती महावितरण उप अभियंता शैलेश राक्षे यांनी दिली. ग्रामीण भागात समस्या असून बांदा, इन्सुलीत सेवा सुरळीत झाली आहे. आरोस गावात समस्या असल्याची माहीती दिली.