सावंतवाडीत हनुमान जयंतीचा जल्लोष !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2024 10:51 AM
views 59  views

सावंतवाडी : हनुमंत जयंतीचा सावंतवाडी शहरासह तालुक्यात मोठा जल्लोष पहायला मिळत आहे. पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमंत जयंतीस सुरूवात करण्यात आली. ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत असल्यानं संपूर्ण परिसर हनुमान भक्तीत तल्लीन होऊन गेला.

पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी शहरातून मारूतीसह फेरी काढण्यात आली. शालेय विद्यार्थांन मारूतीचा वेश धारण करत भक्तांना दर्शन दिल‌. हनुमान जयंती निमित्त भजन, महाआरती, हनुमान चालीसा पठण, गीतरामायण आदीं कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.