
सावंतवाडी : भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत मच्छीमाकेँट येथील सव्हेँ नं. 5068 हा भूखंड सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या मालकीचा असल्याचे सिध्द झाले आहे. या जागेतून नगरपरिषदेने रस्ता काढला; पण भूसंपादन प्रक्रिया राहून गेली. त्या जागेची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी 15 आँगस्ट ला संस्थेच्यावतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भातील उपोषणाची नोटीस संस्था अध्यक्ष शैलैश पई, सचिव डॉ. प्रसाद नावेँकर यांनी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिली आहे. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूल च्या इमारतींचे नुतनीकरण सुरू आहे. जुन्या वास्तू अत्यंत नव्या स्वरूपात आकारास येत आहेत. शाळेतील हे बदल घडत असतांना संस्थेने उप अधिक्षक भूमी अभिलेख यांचेमार्फत जमीन मोजणी केली. तेव्हा शाळे लगतचा दोन गुंठे भूखंड सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या मालकीचा असल्याचे सिध्द झाले. मात्र त्या जागेतून नगरपरिषदेने रस्ता काढला आहे.
ती जागा संस्थेला देखील शाळेच्या विस्तारासाठी उपयुक्त आहे. संस्थेची जागा सावँजनिक प्रयोजनासाठी घ्यायची झाल्यास संस्थेस नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. शहरातील भर बाजारपेठेतील मच्छीमाकेँट येथील मोक्याची जागा घेत असतांना रितसर नियमानुसार होणारी नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन शिक्षणमंत्री दिपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना ही संस्थेने दिले आहे.
कळसुलकर शाळेच्या भूसंपादना संदर्भात मुख्याधिकारी सागर साळुंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखी मार्गदर्शन मागवले आहे. प्रांताधिकारी पानवेकर यांनीही मुख्याधिकारी यांना यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले आहे.