सावंतवाडी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 17, 2025 17:03 PM
views 11  views

सावंतवाडी: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५ - २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २० व २१ सप्टेंबर २०२५ रोजी सावंतवाडी जिमखाना येथे होणार आहे.  भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित, युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षांखालील मुले व मुली आणि खुला गट अशा वयोगटांच्या स्पर्धा होतील.

या स्पर्धेमधील विजेत्यांना खुला गट १ ते ८ आणि ज्युनिअर गट १ ते ४ यांना रोख रकमा आणि पहिल्या दोन विजेत्यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.प्रवेश शुल्क रु. १५०/- व नोंदणी शुल्क रु. १०० /-  सह आपली नावे खालील ठिकाणी गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५ संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत द्यावीत.

सावंतवाडी : राजेश निर्गुण ( ७५१७५३५०२८ )

कुडाळ : शुक्राचार्य म्हाडेश्वर ( ८८५५०६०८०६ )

वेंगुर्ला : ओंकार कुबल  ( ७३८७०३३०१३ )

कणकवली : अनिल कम्मार  ( ९३७०५८८३०८ )

देवगड : प्रकाश प्रभू ( ९४२३३०३८२२ )

स्पर्धा अखील भारतीय कॅरम महासंघाच्या प्रचलीत नियमावलीनुसार खेळविण्यात येतील. खेळाडूंना पांढरा टी शर्ट व फूल पॅन्ट/ ट्रॅक पॅन्ट घालून सामने खेळणे बंधनकारक राहील. या स्पर्धेमधे जास्तीत जास्त मुला मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन असो.चे अध्यक्ष अॅड. अवधूत भणगे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि युवा नेते विशाल परब  यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे सचीव योगेश फणसळकर ( ७६२०७५५७६६ ) यांच्याशी संपर्क करावा.