सावंतवाडी कॉटेज हॉस्पिटलला कायमस्वरूपी भुलतज्ञ मिळणार

राजू मसुरकरांच्या प्रयत्नांना यश
Edited by: विनायक गावस
Published on: June 22, 2023 20:20 PM
views 107  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी भुलतज्ञ मिळणार आहे. यामुळे शस्त्रक्रियेसाठी गोवा-बांबुळी अथवा जिल्हा रूग्णालयावर अवलंबून राहणाऱ्या रूग्णांना दिलासा मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यासाठी राजू मसुरकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व प्रशासनाकडे विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 


उपजिल्हा रुग्णालयातील भुलतज्ञान राजीनामा दिला तर दुसऱ्याने मुदतवाढ घेतली नाही. यामुळे शस्त्रक्रिया करण कठीण होणार होत. गर्भवती महिलांना याचा मोठा फटका बसत असता. रात्री अपरात्री गर्भवती महिलांना शस्त्रक्रियेसाठी इतरत्र हलविताना त्रास सहन करावा लागला असता. सरकारी योजनेत सिझरींग नसल्यानं गोरगरीबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असता. मात्र, आता पूर्णवेळ भुलतज्ञ मिळणार असल्यान रूग्णांची चांगली सोय होणार असल्याच मत राजू मसुरकर यांनी व्यक्त केले आहे.