सावंतवाडीत एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल

चौरंगी लढतीची शक्यता ; युती - आघाडीत बंडखोरी
Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 14:44 PM
views 427  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजता मुदत संपेपर्यंत एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

यात विद्यमान आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे २, सोनाली दीपक केसरकर १, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली २, प्रथमेश तेली १, अर्चना घारे अपक्ष २ तर राष्ट्रवादी (श. प. ) पक्षाच्या नावाने १, विशाल परब अपक्ष १, माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर १,दत्ताराम गावकर १, प्रवीण परब १, देवदत्त गावडे १, असे  एकुण १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. 

सद्यस्थितीत महाविकास आघाडी व‌ महायुतीत बंडखोरी झाली असून ४ नोव्हेंबरनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 310 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी तहसील कार्यालय येथे पार पडेल. 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. मतदारसंघात 2 लाख 28 हजार 483 मतदार आहेत. यात महिला 1 लाख 14 हजार 433 व 1लाख 14हजार 050 पुरूष मतदार आहेत. 310 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.