
सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी राजीनामा दिला आहे. ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. ते आमदारकीसाठी इच्छुक होते. राजन तेली यांच्या पक्षप्रवेशानंतर ते नाराज असल्याची चर्चा होती. आज त्यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
ते म्हणाले, मी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी काम करीत असून मी माझ्या पदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तरी आपण माझा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती श्री. गावडे यांनी केली आहे.