
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष स्व. विकास भाई सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी दिलीप नार्वेकर यांनी विकास सावंत यांच्या रूपाने एक अभ्यासू, शिक्षण,सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व सावंतवाडीने गमावले असे गौरव उद्गार काढले.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास भाई सावंत हे सदैव आमच्या कायम लक्षात राहतील असे उद्गार जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी काढले. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅडवोकेट दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळा धाऊसकर, आनंद परुळेकर, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवा गावडे,अरुण नाईक, तालुका सरचिटणीस अन्वर खान, सुधीर मल्लार, सेवादल अध्यक्ष संजय लाड, बाळासाहेब नंदीहळळी, साक्षी वंजारी, युवक काँग्रेस अध्यक्ष बासीप पडवेकर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर, अमिदी मेस्त्री, प्रतीक्षा भिसे, संदीप सुकी, कौस्तुभ पेडणेकर, समीर वंजारी, समीर भाट, बाबू गवस, चंद्रकांत राणे, पीटर फर्नांडिस, बबन डिसोजा, राकेश चितारी, ग्रेगरी डॉनटस, अमोल सावंत व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.