सावंतवाडीच्या मुख्याधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शाखाप्रमुखासारखं काम करू नये : बबन साळगावकर

Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 11:19 AM
views 91  views

सावंतवाडी : सावंतवाडीच्या मुख्याधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शाखाप्रमुखासारखं काम करू नये, असा इशारा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्षांनी बबन साळगावकर यांनी दिला. 

लोक आमच्याकडे काम घेऊन येतात याचं कारण नगरपरिषदेमध्ये होत असलेला विलंब सावंतवाडीतील नागरिक सुजाण आहेत. अधिकार आहेत म्हणून लोकांचे अपमान करू नका.  एका छोट्या घरासाठी डेव्हलपमेंट चार्जेस भरूनही दोन दोन महिने परवानगी हातात मिळत नाही याचा अर्थ काय ? या कामासाठी आम्ही जर फोन लावला तर तुम्हाला राजकारण वाटतं वैयक्तिक घरांची परवानगीचा काम होणार नाही तर काय ? बिल्डरांच्या कामासाठी तिथे बसलायत काय मलिदा खाण्यासाठी लोक आमच्याकडे विश्वासाने येतात. कारण आमच्याकडून काम होतील.  हा आमच्यावरील असलेला त्यांचा विश्वास आहे.

गेले 25 वर्षे या नगर परिषदेमध्येमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आहे. त्यातील साडेचार वर्ष उपनगराध्यक्ष तसेच पुढील आठ वर्ष नगराध्यक्ष म्हणून या शहराचा कारभार सांभाळला आहे. चुकीचं काम करा म्हणून आम्ही कुठच्याही अधिकाऱ्यावरती आजतागायत दबाव टाकलेला नाही. जनतेच्या कामासाठी हजार वेळा फोन करू नियमात असलेली काम वेळेत होणे हा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे. आम्ही सांगितलं काम नियमात आहे. आम्हाला निष्पक्षपाती कामाची तुमच्याकडून अपेक्षा आहे. प्रत्येक अभ्यंगतांच काम करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आम्ही पाठवलेल्या अभ्यंगतांचा अपमान हा आमचा अपमान आम्ही समजू अपमान कधीही सहन केला जाणार नाही.  निष्पक्ष काम करा कुणाचेही शाखाप्रमुख म्हणून काम करू नका. उद्या नगरपरिषदेमध्ये आमचीही सत्ता असू शकते.  मंत्रीच म्हणत असाल तर आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री मित्र आमच्या आहेत. तसेच केंद्र मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री अत्यंत जवळचे आहेत. 

अनेक मुख्याधिकारी आमच्या कारकिर्दीमध्ये होऊन गेलेत. त्यांच्याकडे आमच्या कामाची जरा चौकशी करा जास्त खोलात जाऊ नका. आंदोलन करून आमचं नेतृत्व उभा राहिला आहे. तुम्ही कार्यभार सांभाळल्यानंतर शहराच्या अवस्थेमध्ये भर पडलेले आहे. कुठचाही धोरणात्मक निर्णय तुम्ही खुर्चीत बसल्या नंतर घेऊ शकलेला नाही.  शहरांमध्ये ठिकाणी कचरा साठलेला दिसत आहे. नालेसफाई एक महिना होऊन गेला तरी जैसे थे आहे. नालेसफाई गटार सफाई झालेली नाही. आपत्कालीन कक्षामध्ये कोणीही नसतं. कार्यालयीन अव्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकलेला नाही, हे तुमचं अपयश आहे. फार जास्त खोलात जात नाही असा संताप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला आहे.