
सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप मंडलाच्यावतीने भटवाडी येथील विठ्ठल मंदिर आणि दत्त मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. भाजपचे प्रदेश युवा उपाध्यक्ष, युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. भोसले यांनी, 'स्वच्छता ही एक सेवा असून प्रत्येकाने यात सहभागी होणे आवश्यक आहे,' असे सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, भाजप शहर सरचिटणीस दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्यासह, केतन आजगावकर, साईनाथ जामदार, मेघना साळगावकर यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर वि. स. खांडेकर विद्यालय आणि जि. प. शाळा क्रमांक ६ मधील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमात रवी नाईक, बंड्या केरकर, नीलम जोशी आणि सीमा नाईक यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक आणि पालक वर्ग सहभागी झाले होते.