मोती तलावात उडी घेतलेल्या त्या युवतीचा मृतदेह सापडला

Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2023 09:52 AM
views 602  views

सावंतवाडी : काल रात्री सावंतवाडीच्या मोती तलात एक अज्ञात युवती बुडाली होती. रात्री उशीरा पर्यंत शोधमोहीम सुरू होती. पोलिस, नगरपरिषद प्रशासनाकडून ही मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, शोधकार्यात अडथळा येत होता. अखेर आज सकाळी तिचा मृतदेह तलावात तरागंतना नागरिकांना दिसला

. नगरपरिषद, नागरिक व पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास कार्य सूरू आहे.