मोती तलावात युवतीची उडी

शोध मोहीम सुरु
Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2023 00:37 AM
views 154  views

सावंतवाडी: शहरातील मोती तलावात एक युवती बुडाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा  घडली. आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

याचवेळी या ठिकणी उपस्थित असलेल्या दानिश राजगुरू या युवकाने तलावात उडी घेत तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. ही युवती २३ ते २५ वयाची असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस हवालदार आबा पिळणकर, अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी गजानन नाटेकर, नंदू गावकर आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शोधमोहीम सूरू केली आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.