महिलांचा दशावतारी नाट्यप्रयोग !

महिला दिनी 'घे भरारी'चा अनोखा उपक्रम
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 26, 2026 18:37 PM
views 44  views

सावंतवाडी : घे भरारी फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी खास झुम्बाचे आयोजन तसेच महिला दिनानिमित्त बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मोहिनी मडगावकर यांनी दिली आहे. घे भरारी फाउंडेशनच्यावतीने एक मार्च 2026 पासून ते 31 मार्च 2026 असा एक महिना महिला व युवतींच्या सुदृढ आरोग्यासाठी झुंबा चे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी ही जागा निश्चित करण्यात आलेली आहे. याची वेळ संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा असणार असून मार्च महिना पूर्णपणे कोणतीही फी आकारली जाणार नाही. तरी जास्तीत जास्त महिलांनी या झुंबाचा लाभ घ्यावा असे आवाहन घे भरारी च्यावतीने करण्यात आल आहे. 

त्याचबरोबर 9 मार्च 2026 रोजी सावंतवाडी शिव उद्यान येथे हे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट आणि बहारदार अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समाजातील भरीव योगदान दिलेल्या महिलांचा विशेष सत्कार होणार आहे. त्याचबरोबर आकर्षक स्पॉट प्राईजेस आणि लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच काही खास नृत्य आणि गाणी असाही कार्यक्रम येथे संपन्न होणार आहे.महिलांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. त्याचबरोबर महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अगदी खास वैशिष्ट्य म्हणजे घे भरारीतीलच महिलांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन घे भरारीच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर , कार्यकारी अध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी , खजिनदार स्वप्नाली कारेकर यांनी केलेले आहे. हा कार्यक्रम सोमवार, 9 मार्च 2026 रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता शिवउद्यान सावंतवाडी येथे होणार आहे.