साटेली - सातार्डा रस्त्यावर अपघात

दुचाकी स्वार गंभीर
Edited by:
Published on: February 23, 2026 19:54 PM
views 27  views

सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा ग्रामपंचायत  समोरील रस्त्यावर मळेवाड ते सातार्डा दरम्यान जाणाऱ्या दुचाकी स्वाराचा आज दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर झाला.

साटेली येथील ग्रामस्थांनी  तत्काळ दखल घेत मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.यावेळी साटेली उपसरपंच बाबा कोरगावकर, शैलेश नाईक,विष्णु मांजरेकर , साटेली ग्रामस्थ , मळेवाड कोंडूरे माजी उपसरपंच हेमंत मराठे यांनी तत्काळ या युवकाला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ अदिती ठाकूर उपचार करत आहेत. अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले आहे.