
कणकवली : तालुक्यातील नाटळ - विकासवाडी येथील रहिवासी तथा माजी सैनिक तुकाराम विश्राम वायंगणकर ( ८८) यांचे २२ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुली, मुलगा,सून, जावई, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. आपल्या सैनिकी कारकिर्दीत तुकाराम यांनी दोन युद्धांमध्ये सक्रिय भाग घेतला होता. अनेक मेडल्स त्यांनी आपल्या खाती जमा केले होते. नुकतेच माध्यमिक विद्यालय नाटळ प्रशालेच्या वतीने जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सत्कार केला होता त्यात त्यांचे नाव अग्रस्थानी होते. समाजिक कार्यकर्ते संतोष वायंगणकर यांचे ते वडील होत.










