सुधा कवठणकर यांचा आमदार केसरकरांनी केला खास सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: February 15, 2026 16:00 PM
views 124  views

सावंतवाडी : आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शिवसेनेचा भगवा फडकवला. या घवघवीत यशाबद्दल राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार केसरकर यांनी कवठणकर यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आज आमदार केसरकर यांच्या कार्यालयात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, सचिन वालवलकर, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, शरद धाऊसकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आरोंदा मतदारसंघातील मतदारांनी सुदन कवठणकर यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच हा मोठा विजय शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सोहळ्याला मतदारसंघातील विजयी उमेदवार, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.