न्हावेलीत योगाचार शिबिराला प्रारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: January 11, 2026 18:49 PM
views 20  views

सावंतवाडी : पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्यावतीने सदगुरू हॉल न्हावेली ( सोनुर्ली तिठा), तालुका सावंतवाडी, मोर्ये निवास येथे आजपासून संयुक्त योगाचार शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर म्हणून पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे जिल्हा प्रभारी  विद्याधर पाटणकर,रामचंद्र कोचरेकर(निवृत्त ग्रामसेवक न्हावेली),गोविंद सखाराम मोर्ये(शब्दसखा ग्रुप वाचनालय अध्यक्ष),त्रिंबक आजगावकर गुरुजी (आदर्श शिक्षक निवृत्त), रविंद्र नाईक (निवृत्त अधिकारी) काळोजी गुरुजी(निवृत्त्त शिक्षक), चंदन गोसावी सर (आरोंदा हायस्कूल शिक्षक), कमलेश दळवी (पोस्ट ऑफिसर)श्री रमेश निर्गुण तसेच  योगेश येरम (योगशिक्षक) हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी विद्याधर पाटणकर यांचे उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिंबक आजगावकर  यांनी केले.आजचा योग वर्ग  विद्याधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री योगेश येरम यांनी घेतला. आजच्या योगवर्गाला  श्री प्रवीण सोनू नाईक,परेश गोविंद मोर्ये मुकुंद जयदेव काळोजी,अंकुश त्रिंबक आजगावकर,सौ. तन्वी तुळशीदास पाटकर रामचंद्र आप्पा कोचरेकर,रमेश निर्गुण,सुशांत पणशीकर व इतर या योगसाधकांची उपस्थिती लाभली.हे योगशिबिर दिनांक 16 जानेवारी 2026 पर्यंत सकाळी 5:30 ते 7:00 या वेळेत सद्गुगुरु हॉल,मोर्ये सर निवास,येथे सुरु राहील.जास्तीत जास्त योगसाधकांनी व योग प्रेमी ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा. योगशिबिराच्या यशस्वीततेसाठी पतंजली योग समितीच्या महिला व पुरुष साधकांनी मेहनत घेतली.योग शिबिरात २१ योग साधकांनी सहभाग घेतला.