
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्यासाठी सेलिब्रिटींना आणावं लागतं हे इथले अधिकारी यांचे दुर्दैव मानावे लागेल. कारण अधिकाऱ्यांनी जर या संपूर्ण प्रशिक्षणाचं शिबिरे ,ट्रेनिंग घेऊन जर काहीच करू शकत नाही. लोकांना माहिती देऊ शकत नाही त्यामुळे आज सेलिब्रिटी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतमध्ये लोकांच मनोरंजन करण्यासाठी आणावे लागत आहेत. आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी, अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे मान्य करतात आणि त्यांना पाहण्यासाठी हे येतात हे दुर्दैवच. कारण सावंतवाडी तालुक्यामध्ये ६३ ग्रामपंचायती आहेत आणि फक्त ४७ ग्रामपंचायत अधिकारी आहेत. सावंवाडी तालुक्यात गटविकास अधिकारी पद जून महिन्यापासून रिक्त आहे. सावंतवाडी मध्ये तळवडे ग्रामपंचायत असू दे किंवा हल्लीच ग्रामपंचायत मळगाव मधील ग्रामपंचायत अधिकारी हा लाच घेताना पकडला जातो. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीचा नियोजन शून्य कारभार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लेखापरीक्षण अहवाल साठी २० ते ३० हजार घेतात. आज तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत अधिकारी हे आयुक्त बदली व्हावी यासाठी २ ते २.५ लाख मोजतात असा आरोप गुरुदास गवंडे यांनी केलाय.
सावंतवाडी पंचायत समितीतील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी हे उसनवारी तत्त्वावर अन्य जिल्ह्यात काम करतात, त्यामुळे या जिल्ह्यात खेळखंडोबा सुरू आहे. पालकमंत्री सांगत आहेत की वाळू उपलब्ध करून देणार शासनाने निर्णय घेतला आहे की प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये ज्याला घर मंजूर झालं त्याला पाच ब्रास वाळू मोफत देणार, परंतु आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयामध्ये कितीतरी वाळूचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे अधिकारी आणि मंत्री यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळेच आज सेलिब्रिटी आणावे लागत असल्याची टीका गवंडे यांनी केली. त्यामुळे गौतमी पाटील ना आणून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ब्रँड अँबेसिडर करा तरच अन्य ग्रामपंचायती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना मध्ये भाग घेतील असा आरोप सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष सावंतवाडी तथा निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केला आहे.










