
सावंतवाडी : आरोंदा येथे पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा, आरोंदा नंबर १ मध्ये पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी पोलीस स्थापना दिनाचे महत्व व पोलीस शस्त्राची मुलांना माहिती देण्यात आली. सावंतवाडी पोलीस निरीक्षक,अमोल चव्हाण,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,आरोंदा दूरक्षेत्र महेश अरवारी,कॉन्स्टेबल बाबूराव जाधव ,यांचे मार्गदर्शना खाली सदरील शस्त्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक, कॉन्स्टेबल आरोंदा आशिष सापळे, संदीप झेंडे, पोलीस पाटील जितेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना देण्यात आले. बंदूक कशी लोड करावी, कोणत्या पद्धतीने हाताळावी, तसेच बंदुकीची रेंज, शत्रूचा नेम कोणत्या पद्धतीने धरावा याची माहिती उपस्थित पोलिसांनी दिली.
यावेळी मुलांनी शस्त्राची माहिती घेत शस्त्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक करून बघितले. शाळेचे मुख्याध्यापक गणपत गावडे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी निंगोजी कोकितकर, ऋतुजा राणे, नूतन निऊंगरे, विद्यार्थी उपस्थित होते. निंगोजी कोकितकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.










