
सावंतवाडी : विसावा सोशल फौंडेशन नागपूर व इंटरननॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट प्रस्तुत नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद नागपूर 2026 मध्ये विष्णु गंगाराम माणगावकर सिंधुदुर्ग यांना ते करत असलेल्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक करण्यासाठी इन्स्परिंग लीडर अवॉर्ड सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या शुभहस्ते विदर्भ हिंदी साहित्य मधुरम सभागृह नागपूर येथे सन्मानपत्र व चिन्ह तसेच गोल्ड मेडल देवून गौरविण्यात आले. विद्यार्थीप्रिय कला शिक्षक विष्णू माणगावकर यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय, कला , क्रिडा, दशावतार, पर्यटन अश्या विविध क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रा. ड्रॉ. बी. एन. खरात संचालक समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग मान. ड्रॉ. रविंद्र दिघोरे समाजसेवक नागपूर. मान. श्री. रामरतनजी हाडगे प्रसिद्ध उद्योजक नागपूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विष्णु माणगावकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
विष्णु माणगावकर यांना त्यांच्या कलेसह सामाजिक कार्याबद्दल यापूर्वी राज्यस्तरीय युवा चित्रकार पुरस्कार 2014, कलाश्री पुरस्कार 2017, राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार 2017, सांस्कृतिक साहित्य पुरस्कार 2017, महाराष्ट्र कला शिव सन्मान 2023, महाराष्ट्र कलारत्न गौरव पुरस्कार 2023, उत्कृष्ट कला शिक्षक पुरस्कार 2023, महाराष्ट्र कला रत्न पुरस्कार 2023, पुणे आर्ट बीटतर्फे कला गौरव पुरस्कार 2023 'ग्लोबल आयडियल टीचर अवॉर्ड २०२४' राष्ट्रीय विशेष कर्तुत्ववान गौरव पुरस्कार 2025 अश्या अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री. विष्णु माणगावकर यांचे सर्वत्र सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकिय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. या बद्दल विष्णु माणगावकर यांचे सर्वच क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.










