जिल्ह्यातील राणे समर्थक कार्यकर्ते एकवटले

Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2026 12:59 PM
views 411  views

सावंतवाडी : अलिकडेच झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये राणे कुटुंबात विसंवाद निर्माण झाल्याचे चित्र राज्यात दिसु लागले. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे समर्थक कार्यकर्ते एकवटले आहेत. 'जय नारायण' या टॅग लाईनखाली एकच नारा असे पोस्टर्स लावत आज जिल्हयात दाखल होत असलेल्या माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‌बांदा ते कणकवली अशी ही महारॅली काढण्यात येणार आहे. हजारो राणे समर्थक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात येणार असून कणकवली येथे सायंकाळी कार्यकर्ता मेळावाही होणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणेंसह हजारो राणे समर्थक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.