
सावंतवाडी : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दि ३० डिसेंबर रोजी होणार असून यादिवशी सकाळी ८:०० वाजता विद्यार्थ्यांचे फनी गेम्स व अल्पोपहार होणार आहेत तसेच सायंकाळी ७:०० वाजता आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष निलेश परब यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलन कार्यक्रम होणार आहे. भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर,माजी जि .प .सदस्य राजन मुळीक,किनळे सरपंच दिपक नाईक ,दांडेली सरपंच निलेश आरोलकर, आरोस सरपंच शंकर नाईक,मळेवाड - कोंडूरे सरपंच मिलन पार्सेकर,साटेली सरपंच श्रावणी नाईक,तळवणे सरपंच गोविंद केरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी केले आहे.










