मळगाव राष्ट्रोळी क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: December 29, 2025 11:49 AM
views 143  views

सावंतवाडी : मळगाव येथील राष्ट्रोळी क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.  ज्ञानदीप कला क्रिडा मंडळ मळगाव आयोजित व उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी, भाजपाचे अमेय पै पुरस्कृत राष्ट्रोळी क्रिकेट लिग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज अमेय पै यांच्या हस्ते पार पडला.

यातील विजेता संघ दक्ष वेध [संघमालक- विश्वनाथ गोसावी] यांना रोख रक्कम व आकर्षक चषक अमेय पै यांच्यामार्फत देण्यात आले. तर उपविजेता संघ स्वामी समर्थ [संघमालक- योगेश गवंडे] यांना देखील रोख रक्कम व आकर्षक चषक अमेय पै यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, निलेश कुडव, तेजपाल सावळ, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, भाजपाचे माजी जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, भाजपा आंबोली मंडळ युवामोर्चा सचिव भुषण बांदीवडेकर, भाजपा तालुका सरचिटणीस सिद्धेश तेंडुलकर, भाजपा मळगाव बुथ अध्यक्ष  दिपक जोशी, प्रमोद राऊळ, प्रकाश राऊळ, रामदास राऊळ, काका देवळी, पांडुरंग राऊळ आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्घाटन मळगावातील जेष्ठ मानकरी काका गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाला सिद्धेश तेंडुलकर, श्रीधर गावकर, शशिकांत राऊळ, प्रकाश राऊळ, योगेश चिंदरकर, प्रमोद राऊळ, गुरुनाथ गावकर, पंढरीनाथ गावकर आदी उपस्थित होते. स्पर्धा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या व शिस्तबद्ध  वातावरणात पार पडली.