आमदार केसरकरांनी केला नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: December 28, 2025 11:20 AM
views 93  views

सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीधर अपार्टमेंट येथे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार श्री. केसरकर यांनी केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे,  दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी, नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर यांचा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता सावंत, संजय पेडणेकर, दिपाली सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.