
सावंतवाडी : येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव अर्थात 'नाताळ' सण संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून या सणाचे औचित्य साधून शिवसेना नगरसेवक देव्या सुर्याजी व शर्वरी धारगळकर यांनी चर्चला तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी भेटी देऊन त्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पदाधिकाऱ्यांसह परिसरातील चर्चला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधला आणि सणाचा आनंद द्विगुणित केला. प्रत्यक्ष ख्रिस्ती बांधवांच्या घरी जाऊन नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड. प्रथमेश प्रभू आदींसह ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.










