
सावंतवाडी : येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे आयोजित द. कृ. वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेत आठवी ते दहावी गटात राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने, तर पाचवी ते सातवी गटात राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या पार्थ उमेश सावंत याने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धो उद्घाटन श्रीराम वान मंदिरचे सचिव रमेश बोंद्रे, संचालक राजेश मोंडकर, सहकार्यवाह बाळ बोर्डेकर, परीक्षक वाय. पी. नाईक, रश्मी पावसकर, ग्रंथपाल महेंद्र पटेल यांया उपस्थितीत साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी बोंद्रे यांनी या स्पर्धेविषयी माहिती दिली. स्पर्धा पुढील वर्षीपासून जानेवारी महिन्यात घेण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
या स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात मिलाग्रीस हायस्कूलाया कोमल सोनू गावडे हिने दुसरा तर मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या श्रेयस हेमंत रेडकर याने तिसरा क्रमांक पटकाविला. तर आठवी ते दहावी गटात आरपीडी हायस्कूलच्या मृणाली मोहन पवार हिने दुसरा तर मदर क्वीन्स स्कूलच्या ब्रह्मी रामदास निवेलकर हिने तिसरा क्रमांक पटकाविला. स्पर्धो परीक्षण वाय. पी. नाईक आणि रश्मी पावसकर यांनी केले. स्पर्धो बक्षीस वितरण स्पर्धा संपल्यावर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी वान मंदिरो कर्मारी महेंद्र सावंत, रंजना कानसे आदी उपस्थित होते.










