
सावंतवाडी : उभाबाजार येथील रहिवासी अमिता दत्तप्रसाद मसुरकर (वय ५५) यांचे शुक्रवारी सकाळी ६ वाजता अल्प आजाराने बेळगाव केएलइ रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, दीर, चुलते, नणंद, भावजय, पुतणे असा परिवार आहे. उभाबाजार येथील सुवर्णकार दत्तप्रसाद प्रभाकर मसुरकर यांच्या त्या पत्नी होत. वेदांत तसेच डॉ. दीक्षा मसुरकर यांच्या त्या आई होत. अमिता मसुरकर यांच्यावर शुक्रवारी दुपारी सावंतवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.










