
सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडाची जागा विकसित करण्याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडीकडून न. प. मुख्यकार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, जागा टाऊन प्लानिंग अंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करीता २०१९ मध्ये आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात आपल्या विभागाने कोणत्याही ठोस हालचाली केलेल्या दिसत नाहीत. जनतेची मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी आहे. जमिन मालक जागा योग्य शासकीय मोबदल्याने देण्यास तयार आहेत. तसे पत्र जागा मालकांनी २६/११/२५रोजी आपल्या कार्यालयास दिले आहे. तरी कृपया लवकरात लवकर उचित कार्यवाही व्हावी अशी मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी यांच्यावतीने तहसीलदार श्रीधर पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, अण्णा देसाई, किशोर चिटणीस, महेश परूळेकर, काका मांजरेकर, रवी जाधव, रूपा मुद्राळे, रविंद्र ओगले, राजू कासकर, संजय लाड, कौस्तुभ पेडणेकर, नंदू घाटे, जितेंद्र मोरजकर, राजू केळुसकर, फ्रान्सिस रॉड्रीक्स, नारायण पंतवैद्य, मुकुंद गवंडळकर आदींसह नागरिक उपस्थित होते.










