
सावंतवाडी : मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने कै. शशिकांत शांताराम नाडकर्णी, बांदा यांच्या कायम ठेव देणगीतून त्यांचे वडील कै. शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई कै. शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ बांदा येथील नट वाचनालयात १३ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकामर्यादित नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून आरपीडी हायस्कूलची अस्मी प्रवीण मांजरेकर ( 'माझा आवडता कवी' - कुसुमाग्रज ) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तर मृणाली मोहन पवार ( 'माझा आवडता कवी' - स्वातंत्र्यवीर सावरकर ) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. प्राथमिक गटातून कु. पार्थ उमेश सावंत याने 'वाचनाचे महत्व' या विषयावर सादर केलेल्या वक्तृत्वसाठी उत्तेजनार्थ पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या यशस्वितेसाठी व RPD प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी , पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक , पर्यवेक्षक श्री. एन.जी.मुठे तसेच पालक , शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.










