
सावंतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व संकटावर मात करून स्व कर्तुत्वाने देशाचे संविधान निर्माते झाले. त्यांनी याच संविधानात सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः हाल सहन केले ते इतरांना होऊ नयेत म्हणूनच भारतीय संविधानात निर्मिती करताना सर्वांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याचे सूत्र त्यांनी संविधानात समाविष्ट केल्याने सर्व संकटाचे उत्तर म्हणजेच भारतीय संविधान असल्याचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक विशाल मोहिते यांनी येथे केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा अथांग महासागर असल्याचे प्रतिपादन स्पर्धा मार्गदर्शक विशाल मोहिते यांनी येथे केले.
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण कार्यक्रमाच्या अभिवादन कार्यक्रमात शनिवारी श्री मोहिते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे बुधाजी कांबळी होते. यावेळी महिला विभागाचे अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर व मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी ममता जाधव यांनी प्रास्ताविक केले व दोन दिवस सुरू असलेल्या महानिर्वाण दिन कार्यक्रमाच्या आढावा घेऊन पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी श्री मोहिते यांनी सुरुवातीला कोणतीही पार्श्वभूमी नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतले आणि अथांग सागरासारखे ज्ञान घेतले. त्यामुळेच त्यांना या देशातील सर्वोच्च भारतीय संविधान निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली याचा आढावा घेऊन फक्त बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक आश्चर्य असल्याचे स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संघर्ष आणि संघर्षातून यश कसं मिळवता येतं याच मूर्तीमंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगून आपण भोगलेल कष्ट सहन केलेल्या यातना पदोपदी सहन करावा लागणाra अपमान आपल्या भावी पिढीला होऊ नये यासाठीच त्यानि राज्यघटने त कशा पद्धतीने सर्वांना समान न्याय दिला हे त्याने सांगून प्रजासत्ताक भारताचे स्वप्न कसं त्यांनी पूर्ण केले हे स्पष्ट केले.
महिलांना समान न्याय व त्यांचे हक्क मिळत नाहीत म्हणून मंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव जगातील उदाहरण असल्याचे सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुळेच भारतीय स्त्री हे ताठ मानेने जगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संकटला आणि समस्यांना उत्तर म्हणजेच आपले भारी तीय संविधान असल्याचे त्यांनी सांगून शिक्षण हाच समाजाचा प्रगतीचा मार्ग असल्याने तो प्रत्येकाने अंगी करावा असे आवाहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच ज्ञानाचा अथांग महासागर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना बुधाजी कांबली यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने बाबासाहेब वाचले पाहिजेt आणि त्यानंतर संविधानही समजून घेणेआवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मीनाक्षी तेंडुलकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे पालन प्रत्येकाने करावे असे आवाहन केले. यावेळी केशव जाधव, भालचंद्र जाधव, बाबासाहेब निकाळजे,
यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. शेवटी चंद्रशेखर जाधव यांनी आभार मानले. या अभिवाद कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी रात्री भीम गीत कार्यक्रमाने करण्यात आली होती. यावेळी अमन अनावकर, तुषार जाधव ,ममता जाधव ,मोहन माझगावकर इत्यादींनी हे भीम गीते सादर केली. त्यानंतर रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजा पाठ घेण्यात आला. शनिवारी सकाळी त्रिशरण पंचशील इत्यादी पूजाविधी पार पडल्यानंतर अनेक मान्यवरांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .त्यात प्रा. देविदास बोर्डे, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, प्रियदर्शनी जाधव चंद्रशेखर जाधव इत्यादी बाबासाहेबाना अभिवादन केले शेवटी सुनील जाधव यांनी आभार मानले.
दुपारच्या अभिमान कार्यक्रमापूर्वी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. दरम्यान सायंकाळी फक्त बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर पासून सायंकाळी सद्भावना भीम ज्योति रॅली काढण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन देविदास बोर्डे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तथा प्रेरणाभूमीमध्ये त्याचा समारोप करण्यात आला.











