
सावंतवाडी : आजारपणामुळे डोअर टू डोअर जाता येत नसल्याने माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आता गाठीभेटींवर भर दिला आहे. शहरातील काही प्रमुख ठिकाणी जात त्यांनी आपल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत.-.कविटकर यांच्यासह उमेदवार वैभव म्हापसेकर, दिपाली सावंत त्यांच्यासह उपस्थित होते. यावेळी दीपक केसरकर यांनी मतदारांशी संवाद साधून आपल प्रेम व आशीर्वाद आपल्या उमेदवारांच्या पाठीशी ठेवावा असं आवाहन केलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










