श्रद्धाराजेंसाठी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी घेतली प्रवीण भोसलेंची सदिच्छा

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 28, 2025 16:03 PM
views 178  views

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांच्यासाठी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले तसेच त्यांच्या मातोश्री सौ. दौडिया यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. 

माजी मंत्री प्रवीण भोंसले व त्यांच्या पत्नी सौ.अनुराधा भोंसले यांची सालईवाडा येथील निवास्थानी ही भेट घेतली. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर ही भेट घडून आली. श्रद्धाराजे भोंसले यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित दिसत आहे,” असे मत राणीसाहेब व्यक्त केले. याप्रसंगी ऍड. शामराव सावंत, प्रा. गोडकर, प्रा. देसाई, मनोज वाघमोरे आदी मान्यवर उपस्थित होते.