
सावंतवाडी : आमिषाला बळी पडू नका, दोन तारीख नंतर तुमच्यासोबत रात्री अपरात्री संजू परब असणार, बाकी कुणी नसणार आहेत. खरं बोलतो म्हणून मला पाडायचं आहे. पण, ही लोकं मला पाडणार नाही. काहीही करतील पण मत मला घालतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. पैशाच्या विरोधातील ही लढाई आहे. कामाला मत द्या, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, समोर दिसणारी माणसं प्रभाग ७ मधील आहे. याच प्रभागात लहानाचा मोठा झालो. पुढे जाणाऱ्याला रोखायचे, अस्तित्व नष्ट करण्यासाठी मला पराभूत करायचं आहे. पैसे वाटून संपवायचा डाव आहे. पण, ही लोक माझ्यासोबत आहेत. मी नगराध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम केल. अधिकारी हजर न झाल्याने मोती तलावची पहिली केस राजघराण्याच्या बाजूनं झाली. नंतर नगरपरिषदेन स्टे घेतला. मी नगराध्यक्ष असताना यासाठी स्ट्रॉंग वकील दिले. राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्ष झाल्यास मोती तलाव हातातून कशावरून जाणार नाही ? मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय आहे. गाडे वाल्यांकडून भाडी वसूल केली जातात. बाजारपेठील नाथ पै सभागृहासमोरील दुकानदारांना नोटीसा गेलेल्या आहेत. तुमच्या समस्या आमच्याकडे बिनधास्त बोलू शकता. समोरचा उमेदवार पैशाचा जीवावर मला तळ्यात विसर्जन करायची वल्गना करतो. मी कोरोनातही काम केलं. लोकांची सेवा देखील करतोय. आता भाषण करणारे तेव्हा कुणीही नव्हते. नगराध्यक्ष असताना विकासकामांचे ठराव घेतले. त्यामुळे पैशाला मत देऊ नका, कामाला मत द्या, माणूसकीला जागा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उमेदवार संजू परब यांनी केलं. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, निरीक्षक राजेश मोरे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










