संजू परबांना घेरण्याचा प्रयत्न, मागे उभे रहा !

२१ - ० करून दाखवा : ॲड. निता सावंत - कविटकर
Edited by: विनायक गांवस
Published on: November 26, 2025 20:46 PM
views 37  views

सावंतवाडी : नगराध्यक्षपदासाठी मी उभी आहे. २० उमेदवार माझ्यासोबत आहे. त्यामुळे २१-० आपल्याला करायचं आहे.  प्रभाग ७ मध्ये संजू परब यांना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यामागे आपल्याला उभं राहायच आहे. आता इर्शेच राजकारण सुरू आहे असे मत शिवसेना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केले. 

आम्ही सामान्य कुटुंबातील आहोत. एसटी ड्रायव्हरची मुलं आम्ही असून शिक्षण घेत मोठे झालो. माझ्या बहीणी अधिकारी आहेत. मी वकील म्हणून कार्यरत आहे. दीपक केसरकर यांनी केलेला विकास, त्यांचा स्वभाव यामुळे जनता आमच्यासोबत आहेत. आमिष दाखवणारे उद्या येणार नाही. सावंतवाडीत दंगल झाली नाही, राजकारणात बळी गेलेला नाही. इथे सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात. माझ्या विरोधात उभ्या असलेल्या व्यक्ती यापूर्वी तुमच्या घरी आलेल्या का ? असा सवाल त्यांनी केला. सावंतवाडी ही राजघराण्याची होती. येथील जमीनी संस्थानच्या असल्याचा दावा कोर्टात आहे. या जमीनीची ताबा मिळावा, नुकसानभरपाई मिळावी म्हणून याचिका आहे. त्यामुळे सावंतवाडी सुरक्षीत ठेवायची असेल तर याचा विचारा व्हावा. आमिषांना बळी पडू नका, मोठ्या रकमा सांगतील. पण, तुमच्या पाठीशी आम्हीच असणार आहोत. दीपक केसरकर, संजू परब तुमच्या मदतीला धावून येणार आहेत असही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उमाकांत वारंग, अशोक दळवी, आनारोजीन लोबो, बबन राणे, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे आदी उपस्थित होते.