
सावंतवाडी : प्रभाग क्रमांक १ मध्ये अपक्ष उमेदवार ॲड. समीऊल्ला ख्वाजा व फरीदा बागवान यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. डॉक्टर साईनाथ पित्रे व मौलाना शमिन यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उमेदवार ॲड. ख्वाजा म्हणाले, आम्ही या निवडणुकीत अपक्ष उभे आहोत. सर्वच राजकीय पक्ष आश्वासन देतात. पण, ती पूर्ण करत नाही. प्रभाग १ चा आवाज म्हणून आम्ही उभे आहोत. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहोत. द्वेष पसरविण्याचे काम होत असताना आपला आवाज बनविण्यासाठी आपल्यातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला पाठविण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही एकजुटीने उभे राहणार आहोत. सर्वच राजकीय पक्षांनी आमचा अपेक्षा भंग केलेला आहे अस मत ॲड. समीऊल्ला ख्वाजा यांनी केल. तसेच उमेदवार फरीदा बागवान यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज खानापुरी, निलोफर बेग, जाहीदा खान, मुबारक खान, सूरज सावंत, तौसिफ शेख आदींसह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.










