
सावंतवाडी : प्रभाग क्रमांक ७ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आर्या सुभेदार व श्री संदीप राणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवार सीमा मठकर यांना मताधिक्य देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संदीप राणे व आर्या सुभेदार नवे चेहरे उबाठा शिवसेनेकडून रिंगणात आहेत. डोअर टू डोअर प्रचार करण्यावर त्यांनी भर दिली आहे. दोन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांनीही जोरदार प्रचार केला आहे. यावेळी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांचीही प्रमुख उपस्थिती होती.










