
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत रंगत वाढत असून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मदतीला शिवसेना फायर ब्रॅण्ड आमदार निलेश राणे देखील उतरले आहेत.
आज सायंकाळी ७ वाजता खासकीलवाडा, मांगिरीश बॅकवेट हॉल परिसरात त्यांच्या कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे. निलेश राणे यांच्या सभेकडे कार्यकर्त्यांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे. सावंतवाडीच्या विकासाबाबत आणि राजकीय मुद्द्यांवर राणे नेमके काय भूमिका मांडतील याची उत्सुकता वाढली आहे.










