
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी ७ अपक्षांनी नामनिर्देशन पत्र कायम ठेवल असून आज त्यांना चिन्हांच वाटप करण्यात येणार आहे. या प्रकीयेला सुरूवात झाली सल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
नगराध्यक्षपदास २, नगरसेवक पदासाठी ५ असे ७ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांचाही मोठा जोर आहे. यात नगराध्यक्षपदासाठी अन्नपूर्णा कोरगावकर व निशाद बुराण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तसेच बबलू मिशाळ, सुरेश भोगटे आदींनी अर्ज कायम ठेवलेत. प्रचाराता देखील अपक्ष कमी नाहीत. आज चिन्ह वाटप होणार असल्याने त्याकडे उमेदवारांसह शहरवासियांच लक्ष लागून राहिले आहे.










