
सावंतवाडी : नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे जिल्हात येत असून सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि २१ उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या ठिक १० वा. गांधी चौक सावंतवाडी येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती भाजप कार्यालयातून देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत येऊन काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे.










