
सावंतवाडी : मार्गशीर्ष महिन्यास प्रारंभ झाला असून त्या निमित्ताने निघालेली स्वामी समर्थांची पालखी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी केसरकर यांच्याकडून पुजाअर्चा, आरती करण्यात आली.
आरतीनंतर पालखीने प्रस्थान केलं. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पालखीचे भोई बनत भक्तीत लीन होताना दिसले. यावेळी स्वामी नामाचा जयघोष भक्तांकडून करण्यात आला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आध्यात्मिक क्षण यानिमित्ताने सावंतवाडीत दिसून आले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दत्ता सावंत, आबा केसरकर, विश्वास घाग, अर्चित पोकळे, गजानन नाटेकर, समीर पालव आदींसह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.










